मागण्यासाठी महावितरण परिमंडळासमोर द्वारसभा संपन्न

मागण्यासाठी महावितरण परिमंडळासमोर द्वारसभा संपन्न

लातुर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय विद्युत कर्मचारी संघटन लातूर परिमंडळच्या वतीने विविध मागण्यासाठी महावितरण परिमंडळासमोर नुकतीच द्वारसभा संपन्न झाली. संघटनेच्या धोरणात्मक व प्रलंबित मागण्याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सहायक अभियंता ते उपकार्यकारी अभियंता या पदाच्या पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय पदवीकाधारक (Diploma (Holder) अभियंत्यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. तरी पदवीकाधारक अभियंत्यावर झालेला पदोन्नतीतील अन्याय दूर करावा, महावितरण कंपनीमधील सर्व मृत कर्मचारी वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरूपी कंपनीच्या सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामिल करून घेण्याकरिता कालबद्ध धोरण आखून त्याची विनाविलंब अंमलबजावणी करावी. महावितरणमध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबविताना विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहायक, कार्यालयीन सहाय्यक ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता स्थायी स्वरूपात भरण्यात यावीत, मागासवर्गीयांचा अनुशेष कंपनीच्या एकूण मंजूर व कार्यरत पदांच्या आकडेवारीसह विशेष भरती अभियान राबवून विनाविलंब भरण्यात यावा, महावितरण कंपनीचे विभाजन करण्यात येऊ नये, कंपनीच्या अंतर्गत सुधारणावर अधिक भर देवून सक्षमीकरण करण्यात यावे, बीजबील थकबाकी वसुलीदरम्यान कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्राहकाकडून दमदाटी, धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार राज्यभरात सातत्याने घडत आहेत. याबाबत संरक्षणार्थ ठोस उपाययोजना करावी, महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्र. ४४४, दि. १६-०१-२०१३ रद्द करण्यात यावे. तसेच दि. ३१ १२-२०१७ नंतर बंद करण्यात आलेल्या निम्नस्तर लिपीकांच्या निम्नस्तर सामान्य प्रशासन व निम्नस्तर लेखा विभागीय परिक्षा पूर्ववत सुरू करण्यात याव्या व सामान्य प्रशासन व लेखा असा भेदभाव न करता पूर्वीप्रमाणेच उच्चस्तर लिपिकपदी पदोन्नती झाल्यानंतर सामान्य प्रशासन किंवा लेखा कॅडर निश्चित करण्यात यावेत, महावितरणमधील तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावेत व त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा. महावितरणमधील यंत्रचालक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीमध्ये झालेला अन्याय व वेतनश्रेणीमधील तफावत दूर करण्यात यावी. सेवाअंतर्गत पी.एचडी. व एम. बी. ए. चे उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांना पूर्वीप्रमाणेच जादा विशेष वेतनवाढी देवून त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे.

महावितरण कंपनीचा विस्तार झपाट्याने होत आहे. ग्राहकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांवर त्यामुळे प्रचंड ताण येत आहे. तरी नवीन शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालय निर्माण करण्यात यावे. १२) गटविमा योजनेचा (मेडीक्लेम) कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार बीज कर्मचाऱ्यांवर न लादता सदर योजनेअंतर्गत कॅशलेश वैद्यकीय सेवेचे फायदे महावितरणने स्वतःच्या महसूलातून देण्याची कार्यवाही करावी. १३) महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करावी. १४) वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं.) यांची चेतनश्रेणी वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) यांच्या वेतनश्रेणीच्या समकक्ष करण्यात यावी या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा द्वारसभेत झाली आहे. असे बालाजी कांबळे कार्याध्यक्ष लातूर परिमंडळ यांनी सांगितले या द्वारसभेस लातूर परिमंडळातील सर्व पधादिकारी व सभासद मोठ्या संखेने खालील प्रमाणे उपस्थित होते. एन डी पोटभरे साहेब (केंद्रीय उपाध्यक्ष), आर एस गायकवाड साहेब (लातूर परिमंडळ अध्यक्ष), सिद्धार्थ कुसबागे (लातूर परिमंडळ सचिव), बालाजी कांबळे साहेब (लातूर परिमंडळ कार्याध्यक्ष), डिके गवळी साहेब (लातूर परिमंडळ मुख्य संघटक), बापू जगदे साहेब (उस्मानाबाद मंडळ सचिव), कल्याण मस्के साहेब (बीड मंडळ अध्यक्ष), शेख मुजम्मिल (बीड मंडळ सचिव), प्रकाश कांबळे (लातूर मंडळ सचिव), संजय नाटक रे (लातूर मंडळ अध्यक्ष), सूर्यकांत ढवळे साहेब (लातूर मंडळ उपाध्यक्ष), बी आर जाधव (अंबाजोगाई विभाग अध्यक्ष), आर आर स्वामी (अंबाजोगाई विभाग मुख्य संघटक), संतोष राख (अंबाजोगाई विभाग सचिव), संजय सगर (लातूर विभाग अध्यक्ष), डी डी कांबळे (लातूर विभाग सचिव),टी जी रोडे (लातूर विभाग कार्याध्यक्ष) वाघमारे एम बी, नागेश हळगावकर , स्वामी नागेश, राहुल विक्रम जोगदंड, बालाजी आगवणे, सुदाम ओव्हाळ, कल्याण गंगावणे, डी एस राठोड, एन के सिताफ, माने बीबी, सोनटक्के, सूर्यकांत ढवळे, अर्जुन खंदारे, राहुल बनसोडे, मारोती मटकमवाड,पोकळे एन ए, अहमद शेख, मनोज बनशेळकी कर, रहिम अखंड, रेखावार श्‍यामवले, इतर सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!