महात्मा फुले महाविद्यालयाचे ‘जिजाऊ-सावित्री’ कार्य गौरव पुरस्कार जाहीर

महात्मा फुले महाविद्यालयाचे 'जिजाऊ-सावित्री' कार्य गौरव पुरस्कार जाहीर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रामध्ये नि:स्पृहपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिल्या जाणारा ‘ जिजाऊ – सावित्री कार्य गौरव ‘ पुरस्काराची घोषणा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार व डॉ.सतीश ससाणे केली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविणारे प्राचार्य म्हणून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे, अहमदपूर तथा परिसरात आपल्या संसारिक कार्याबरोबरच समाज उपयोगी कार्य करणाऱ्या त्यागमय स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा या उद्देशाने महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने दर वर्षी ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन ‘ अनोख्या पद्धतीने महिलांचा सन्मान केला जातो. यावर्षी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व डॉ. सतीश ससाणे यांच्या अभिनव संकल्पनेतून समाजशास्त्र विभागाने’ जिजाऊ-सावित्री कार्य गौरव पुरस्कार’ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना जाहीर केले असून सन २०२२ मधील विविध क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी आहेत त्या सौ. आशा गोपीकिशन भराडिया (साहित्यिक, लातूर), सौ. कल्पना विनायक जोंधळे (कंडक्टर, धानोरा,) सौ. सारिका मधुकर सोनकांबळे (आंगणवाडी मदतनीस, खंडाळी), डॉ. कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर (संशोधन, धसवाडी), इंदुमती वैजनाथ वाघमारे (सफाई कामगार, अहमदपूर), नसिरा बेगम खुरेशी ( सामाजिक, अहमदपूर) , डॉ. सौ.सुचिता रमेश कापसे (वैद्यकीय सेवा, अहमदपूर), विद्यादेवी रामराव टाळकुटे (सामाजिक, अहमदपूर) या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांना ‘ जिजाऊ-सावित्री कार्य गौरव’या पुरस्काराने दिनांक ८ मार्च २०२२ रोजी महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने संपन्न ‘जागर स्त्री शक्तीचा: सन्मान स्त्री कर्तृत्वाचा” या विषयावर संपन्न होणा-या कार्यशाळेत त्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!