सहा जणांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली
पिंपरी (रफिक शेख) : तरुणीचे व्हिडीओ शूटिंग काढल्याच्या संशयावरून सहा जणांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली. हा प्रकार आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी येथे १ मार्चला सकाळी दहा ते सव्वादहा या कालावधीत घडला. बबली राजू म्हस्के (वय ३८, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. ४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्टीवन उर्फ बॉबी विजय पीटर (वय २४), सायली रॉबीन पीटर (वय २३), स्मिता उर्फ मय्या विजय पीटर (वय ४५), रॉबिन उर्फ शशी विजय पीटर (वय २५), सनी ज्ञानू शिरसठ (वय ३६), कविता सनू शिरसठ (वय ३८, सर्व रा. आंबेडकर कॉलनी, बुद्ध विहार जवळ, पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
