लोखंडी सुऱ्यासह तीन कोयते केले जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या

लोखंडी सुऱ्यासह तीन कोयते केले जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या

पिंपरी (रफिक शेख) : शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोयते व एक सुरा पोलिसांनी जप्त केला. शहरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (दि. ४) नही कारवाई झाली.

आकाश राजू काळे ऊर्फ कपाळ्या (वय २६, रा. पत्रा शेड, लिंक रोड, – चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी विजयकुमार आखाडे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी कपाळ्या याच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास लिंक रोड येथे कारवाई करून आरोपीकडून कोयता जप्त केला. तसेच त्याला अटक केली.

दयानंद देविदास सरोदे (वय ३३, रा. बालाजीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली. हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी रवी पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी हे शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई महामार्गाच्या व येथील सेवारस्त्यावर कामानिमित्त गेले. त्यावेळी आरोपी शिवीगाळ करून लोकांना धमकावत होता. तिथे असलेल्या पॅसेंजर गाड्या भरून देत होता; त्यामुळे फिर्यादीने त्याला हटकले असता तो पळू लागला. त्यावेळी त्याला पकडले असता त्याच्याकडे सुरा मिळून आला.

कुणाल पप्पू इजगत (वय २२, रा. निराधारनगर, भाटनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कर्मचारी गणेश कर्पे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी कुणालकडे कोयता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून कोयता जप्त केला.

About The Author

error: Content is protected !!