पुण्यातील कुख्यात गुंडाला कोल्हापुरात अटक

पुण्यातील कुख्यात गुंडाला कोल्हापुरात अटक

पोलिसांची वेशांतर करून कारवाई

पुणे (रफिक शेख) : खून, दरोडा, घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यात गेले दीड वर्षे वानवडी (पुणे) पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मख्खनसिंह अजितसिंग कल्याणी (वय ४१ मंदिराशेजारी, रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. कोल्हापुरात रुईकर कॉलनीत शीख समाजाचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने सुरू आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी वेशांतर करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंभीर गुन्हे करून पसार असलेला कुख्यात गुन्हेगार मख्खनसिंह कल्याणी हा पुण्यातील वानवडी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून कोल्हापुरात असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रुईकर कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात पाहणी केली. अनेक जिल्ह्यांतून ४०० हून अधिक शीख बांधव खेळण्यासाठी व पाहण्यासाठी आले होते.

संशयिताचा फोटो नसताना रा.साई फक्त वर्णनावरून पोलिसांनी कौशल्यपूर्ण व गोपनीयतेने तपास करत संशयितास हेरले. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. चाहूल लागताच, त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. वानवडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर, त्यांचे पोलीस पथक त्याचा ताबा घेऊन निघून गेले.

About The Author

error: Content is protected !!