छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे (रफिक शेख) : माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे घडली. आरती सुनील खडसे (वय २१, रा. रामनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुनील त्र्यंबक खडसे (वय ३०), सासरा त्र्यंबक खडसे, सासू, नणंद ममता, सविता, अनिता व अनिताचा नवरा, आणखी नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरती या सासरी नांदत असताना त्यांनी माहेराहून पैसे घेऊन येण्यासाठी आरोपींनी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. वेळोवेळी पैशांची मागणी करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार. ७ मे २०२१ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत घडला. दरम्यान, विवाहितेला, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!