अन्नधान्य ग” परिमंडळ कार्यालयात शिपाई नसल्याने नागरीकांची कामे रेंगाळली!

अन्नधान्य ग" परिमंडळ कार्यालयात शिपाई नसल्याने नागरीकांची कामे रेंगाळली!

शिपाई देता का म्हणण्याची वेळ आली आहे

पुणे (रफिक शेख) : पुण्यातील मध्यवस्तीत असलेले रेशनिंग कार्यालयात शिपाई नसल्याने नागरीकांची कामे रेंगाळली असुन शिपाई देता का शिपाई अशी म्हणण्या ची वेळ कार्यालयातील कर्मचाऱ्यावर आली आहे. मध्यवस्तीत असलेले ग” परिमंडळ कार्यालय हे झोपडपट्टयांनी व्यापलेले असुन रेशानिंग कार्यालयात येणाऱ्या नागरीकांची संख्या जास्त प्रमाणात आहे जेमतेम कर्मच्या ऱ्यांची संख्या असल्याने त्याचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. शिपाई लता सणस ह्या एक वर्ष झाले निवृत होऊन तरी अद्यापही कार्यालयीन कामगाजा साठी शिपाई मिळाला नाही विशेष म्हणजे ग” परिमंडळ अधिकाऱ्याची ५ वेळा अन्न धान्य वितरण कार्यालयाला पत्र व्यवहार करूनही त्या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे परिमंडळ कार्यालयात एजंटाचा वावर वाढलेला असुन शिपाई नसल्याने एजंट शिधा पत्रिका लिहत असल्याचे नागरीकांनी निर्देशनास आणुन दिले. तर कर्मचारी ऐकमेकांनवर आरोप करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. अधिक माहिती साठी ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

About The Author

error: Content is protected !!