महिलेचे फोटो काढणे सरपंचाच्या मुलाला पडले महाग
पिंपरी (रफिक शेख) : महिलेचे फोटो काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तिच्या पतीने याबाबत जाब विचारला असता शिवीगाळ केली. विनयभंग प्रकरणी मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्या सरपंचाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल केला.ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाजूला एका हॉटेलसमोर २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. ५) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवम किसन बावकर, ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांच्या मुलाच्या विरोधातपोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, पुणे-मुंबईद्रुतगती मार्गावर एका हॉटेलसमोर फिर्यादी महिला त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला केळी खाऊ घालत होत्या. त्यावेळी चारचाकी वाहनामधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेचे फोटो काढून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. हा ” प्रकार लक्षात आल्याने फिर्यादी. महिलेच्या पतीने याबाबत आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ व दमदाटी केली. ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांचा मुलगा हातात पेव्हिंग ब्लॉक घेऊन फिर्यादी महिलेच्या पतीच्या अंगावर धावून आला असे फिर्यादीत नमूद आहे.