मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण

मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण

पिंपरी (प्रकाश इगवे) : मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादातून दोनजणांना बेदम मारहाण केली. आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला. थेरगाव येथे २ मार्च रोजी रात्री आठ आणि नऊच्या सुमारास ही घटना घडली.क्रिश (वय १९), क्रिशची बहीण मोना (२०), सौरव गुंजाळ (१९), रोहित गोयरयाप्रकरणी (२१, सर्व रा. थेरगाव), अनोळखी तीन ते चारजणांवर गुन्हा दाखल केला. सविता संदीप तरडे (३५, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मुलगा प्रेम तरडे याच्या मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी प्रेमआणि त्याचा मित्र महेश पलमट्टे यांना मारहाण केली. आरोपी सौरव याने महेश याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याला जखमी केले.हे भांडण मिटविण्यासाठी फिर्यादी महिलेचा पती, मुलगा प्रेम आणि त्याचा मित्र महेश पलमट्टे असे तिघेजण गेले. त्यावेळी आरोपींनी पुन्हा वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

About The Author