महिलेचा विनयभंग 28 वर्षीय तरुणाला अटक

महिलेचा विनयभंग 28 वर्षीय तरुणाला अटक

पिंपरी (रफिक शेख) : खिडकीत उभा राहून तरुणाने अश्लील हावभाव केले. त्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. विनयभंगप्रकरणी २८ वर्षीय तरुणाला अटक केली.संतनगर, मोशी येथे शुक्रवारी (दि.४) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. ५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरासमोर आरोपी राहत होता. फिर्यादी त्यांच्या किचनमध्ये काम करत होत्या, त्यावेळी आरोपी त्याच्या खोलीच्या खिडकीत येऊन अंगावर कपडे नसतानाअश्लील हावभाव करत असल्याचे फिर्यादीला दिसले. फिर्यादीने याबाबत त्यांच्या पतीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीने त्यांच्या इमारतीमधील एका महिलेसह दोघांना बोलावून हा प्रकार दाखवला. तर आरोपीने त्यांच्याकडे बघूनही अश्लील हावभाव केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

About The Author