तंबाखू मळली नाही म्हणून वाद; तरुणाला मारहाण

तंबाखू मळली नाही म्हणून वाद; तरुणाला मारहाण

पिंपरी (रफिक शेख) : तंबाखू मळून देण्याच्या कारणावरून वाद घालून तिघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. तळेगाव स्टेशन येथे शुक्रवारी (दि. ४) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.मयूर निवृत्ती झोडगे (वय ३३, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवा खैरे (वय २८), मयूर भोकरे (२६), अमर चव्हाण (२६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिकमाहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथे हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी तेथे शिवा खैरे याने तंबाखू मळून देण्याच्या कारणावरून फिर्यादीशी वाद घातला. शिवा खैरे व त्याच्या बरोबरीने मयूर भोकरे व अमर चव्हाण यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मयूर भोकरे याने चहाचा थर्मास फिर्यादीच्या डोक्यात घालून फिर्यादीला गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

About The Author