दौंड नगरपालीकेच्या पाणी पुरवठा तलावात ३ महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडुन मृत्यु…!
दौंड (प्रतिनिधि) : कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील नगरपालीकेच्या पाणी पुरवठा तलावा मध्ये बुडुन ३ महा विद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्याची धक्काधायक घटना रविवारी ता. ६ ला घडली आहे. सदर घटनेतील दोन मुले सखे चुलत भाऊ असुन तिसरा त्यांचा मित्र आहे. आसरार अलीम काझी वय – २१ करीम अब्दुल हादी फरीद काझी वय – २० आणि अतिक उझजमा फरीद शेख वय – २० अशी दुर्घटनेत मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याची नावे आहे. दौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आसरार काझी, करीम काझी, आणि अतिक शेख हे तिघेही नवगीरे वस्ती येथे कुटुंबासोबत राहतात रविवारी ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून फिरावयास घराबाहेर पडले होते.रात्र झाली तरी देखिल ते घरी आले नाहीत त्यामुळे मुलाच्या पालकांनी निघांनाही मोबाइल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्याचा मोबाईल बंद होता तसेच त्याच्या बरोबर असलेल्या मित्र अतिक शेख याला मोबाईल वर संपर्क साधला असता. त्याच्या मोबाईलची फक्त रिंग वाजत होती परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिघांच्या ही पालकांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिन्ही मुलांच्या मित्रांशी विचारणा केली असता. निघेही नगरपालीके च्या पाणीपुरवठा तलावावर जाणार असल्याची माहीती मिळाली पालकांनी मुलांचा सदर परिसरामध्ये शोध घेत असताना तलावा शेजारी मुलांची दुचाकी . कपडे व बॅग दिसुन आली . व मुले तेथे आढळुण आली नाहीत. त्यामुळे मुले पाण्यात बुडाले असल्याची शंका पालकांना आली. पालकांनी तातडीने दौंड पोलीसांशी संपर्क साधला. या घटनेची माहीती मिळताच दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत तलावा तील पाण्यात मुलांचा शोध घेतला. साधारणत: रात्री १२ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.