अहिल्यादेवी होळकर चौक येथे परवाना धारक रिक्षा शाखेचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक,नवीन रेणापूर नाका येथे परवाना धारक रिक्षा संघटना शाखेचा शुभारंभ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
नांदगाव येथील परवाना धारक रिक्षा चालकांना ऑटो पॉईंटसाठी खूप मोठी अडचण निर्माण झालेली होती. ती अडचण लक्षात घेता नियमानुसार अहिल्यादेवी होळकर चौक, नवीन रेणापूर नाका येथे ऑटो पॉईंट शाखेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिंदे, ॲड.सिध्दू भोसले, मच्छिंद्र कांबळे, वसंत ढमाले, रोहित पाटील, दत्ता कळबंडे, किर्तिमान जगताप, शाखाध्यक्ष बिरुदादा काळे, शाखा उपाध्यक्ष खंडू घोडके, महादेव सातपुते, सुनिल कुसभागे, हरून चाऊस, नितीन धुमाळ, शाहरुख शेख, विठ्ठल ढमाले व तसेच इतर ऑटो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.