बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन रुद्धा ता अहमदपूर येथे महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा श्रीमती प्राचार्य रेखाताई तरडे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून संचालिका शिवालिकाताई हाके, प्राचार्य रूत चक्रनारायण , शुभांगी सूर्यवंशी, दिंडे मॅडम, देवकते मॅडम, शिंदे मॅडम, रूपा पाटील, आरती पुणे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साक्षी गवळी या विद्यार्थिनीने महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले या विद्यार्थिनीच्या उत्कृष्ट वकृत्वा बद्दल संस्था सचिव रेखाताई तरडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, संग्राम कोपनर, कालिदास पीटाळे, संतोष लातुरे ,शेख तोहिद, समीर कुरेशी, अभिमनु भिसे ,सूर्यवंशी महेश, नंदागवळी नंदकिशोर, गणेश एमगीर, विजय कुलकर्णी, बालाजी देवकते, शरण हन्डराळे, सतीश केंद्रे आदी उपस्थित राहून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!