प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
लातूर (प्रतिनिधी) : प्रभुराज प्रतिष्ठाणच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त पालात राहणाऱ्या महिलांना सोबत घेऊन दिन साजरी करण्यात आला आयुष्यभर काबाडकष्ट करुण जीवन जगणाऱ्या महिलांना कोणीच प्रवाहात घेत नाही पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या सतरा वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाल ठोकुन लोखंडी औजारे बनवीणाऱ्या भटक्या जाती, जमातीतिल कुटुंबाना हक्काचे घर नाही की जमीन परंतु परिस्थितिशी दोन हात करीत हे कुटुंब जीवनाचा एक एक दिवस तापलेल्या लोखंडावर घाव घालून त्याला घडविन्यात घालत आहे. कुठे दाद ना तक्रार मिळेल त्या मजूरीतुन कुटुंबाचा पालात गाडा चालविने, हा त्यांचा सिस्ता राहिला आहे.प्रभुराज प्रतिष्ठान मित्राने पालावर जाऊन तेथील महिलांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. यावेळी प्रतिष्ठाण अध्यक्ष अँड. अजय कलशेट्टी, अँड.कल्पना भुरे,अँड.सुनंदा इंगळे,जेष्ठ नागरिक पंडित शिंदे, शंकर गिरी, ज्ञानोबा मोरे, दीपक सगर, श्रीकांत लोहार, अशोक पवार, लक्षीमन ठाकूर, राजू जगताप, देवा राठोड, सचिन भोसले, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.