शिराळा येथे जागतिक महिला दिन साजरा
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि उज्वल व हिंदवी बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने “शिराळा येथे “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन.स्त्रियांवर होत असलेले अत्याचार,अन्याय दूर व्हावे,सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.त्याचप्रमाणे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य आणि उज्वल व हिंदवी बचत गट शिराळा यांच्या वतीने उत्साहामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊसाहेब,आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,सर्वप्रथम प्रतिष्ठान चे मुख्यसंघटक श्री ज्ञानेश्वर दादा काळे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये महिला मधील ‘ती’ काय असते ती आई असते, तीच माई, असते,आणि तीच ताई,असते,तीच सर्वांची आजीबाई असते, अशाप्रकारे “ती” चे महत्व पटवून दिले,तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मॅनेजर हरकळ साहेब यांनी बचत गटासाठी कर्ज कसे घ्यावे, त्याचा परतवा कशा पद्धतीने करावा असे सखोल मार्गदर्शन केले,तसेच त्या ठिकाणी महिला दिनाचे औचित्य साधुन वेगवेगळ्या 40 बचत गटाच्या 400 महिलांचा व आशा कार्यकर्त्या यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमच्या शेवटी आनिताई काळे यांनी आभार मानून “नारी तू महान, “विश्वाची आहेस शान अशी घोषणा देऊन सर्व महिलांचा उत्साह वाढवला,आशा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिराळा गावचे पोलीस पाटील बळवंतराव पाटील होते,तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाढण्याससाठी प्रतिष्ठानचे राज्य संघटक ज्ञानेश्वर काळे,जिल्हा समन्वयक राहुल मोहिते-पाटील, जिल्हा प्रवक्ते कल्याण देशमुख, तसेच प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण आतकरे ,राहुल गव्हाणे,श्रीकांत देशमुख,ज्ञानेश्वर विमलचंद काळे,मयूर करदुरे व उज्वल व हिंदवी बचत गटाच्या ज्योती ताई काळे ,अनिता ताई काळे,संध्या काळे,आज्ञा काळे या उपस्थित होत्या.