जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : इंदिरा गांधी प्राथमिक रेणुकादेवी माध्य.व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,वसंतनगर(म) ता.जि.लातूर येथे एकलव्य मागास सेवा समितीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती.नलवाडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रा.ज्योती मॅडम, प्रा.प्रणिता मॅडम, अधीक्षक-शारदा मॅडम, कोरेताई, गवळे ताई, बाजगिरेताई व विद्यार्थिनी यांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मार्गदर्शन काळे व प्राध्यापक ज्योती मॅडम यांनी केले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा नलवडे मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक ढवळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!