अमदपुर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचन बध्द – आ. बाबासाहेब पाटील

अमदपुर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचन बध्द - आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अहमदपुर विधानसभा मतदार संघाचा  शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते दि. ६ मार्च रोजी नगर परिषदेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 44 कोटी 52 लक्ष रुपयांचा जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मद्दे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड हेमंत पाटील, नगर परिषदेचे कार्यकारी उपाध्यक्ष अॅड अमित रेड्डी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस वि कायंदे, अभियंता विकास बडे, पाणीपुरवठा सभापती अनुराधाताई नळेगावकर, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, अभय मिरकले, सय्यद सरवर लाल, रवि शंकर महाजन, अॅड सय्यद अलीम, सुनील डावरे, सौ चंदाताई उपाध्ये, अजहर बागवान, विकास महाजन, वसंतराव शेटकार, शिवाजीराव खांडेकर, चंद्रशेखर भालेराव, सह मान्यवर उपस्थित होते.
     
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील पुढे बोलताना म्हणाले की शहरातील नळयोजना, व्यापारी संकुल, प्रशासकीय इमारत, वैभव लॉज ते थोडगा रोड रस्त्याचे बायपास सिमेंटीकरण, शहरातील सर्व स्मशानभूमीचे सुशोभीकरणा सह दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व रस्त्यांचा विकास करणार असल्याचे सांगून या कामी दोन्ही माजी आमदार, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि शहरवासीयांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या समयी नगराध्यक्षा अश्विनी ताई कासणाळे म्हणाल्या की आता नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत असल्याचे सांगून माझ्या काळात नळयोजना, हुतात्मा स्मारक, समशान भूमी सुशोभीकरण, रस्ते, नाली यासह इतर कामे आमदार साहेबांच्या सहकार्याने सर्व नगरसेवकांच्या सकारात्मक प्रयत्नातून झाल्याने आज एक वेगळे समाधान वाटत असल्याचे सांगून त्या भावनिक झाल्या.
     
यावेळी नगरसेवक अभय मिरकले, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. कायंदे यांचे मनोगत पर भाषणे झाली. प्रारंभी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस स्तंभाचे, जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट अमित रेड्डी यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे यांनी तर आभार गटनेता डॉ.फुजेल जागीरदार यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी नपच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author