ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठी निराशा जनक – आ. रमेशआप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यासाठी अत्यंत निराशाजनक असून ग्रामीण भागातील विकासाकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प विधान भवनात सादर केला असल्याची टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या सभागृहात सादर केला या अर्थसंकल्पात राज्याच्या हिताचे आणि प्रगतीकडे घेऊन जाणारे कुठलेही ठोस निर्णय दिसून आले नाहीत खऱ्या अर्थाने गेल्या दोन वर्षात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी कोणतीच दिलासा देणारी योजना जाहीर केली नाही हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचा समाजातील सर्व घटकांना निराशा करणारा आहे असे आ रमेशआप्पा कराड यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
पिक विमा योजनेत गंभीर त्रुटी असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्या ऐवजी कंपन्यांनाच होतो हे लक्षात घेऊन पिक विमा योजनेत ठोस भूमिका घेण्याची गरज होती तसे काहीच केले नाही दोन लाखापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सरकारने घेतली होती मात्र कोरोनामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही या अर्थसंकल्पात घोषणा होणे अपेक्षित होते मात्र तसेही झालेले नाही पेट्रोल-डिझेलचा कर कमी करण्यासाठी शासनाने काहीही केले नाही मराठवाड्याच्या दुष्काळ आणि पाणी टंचाई साठी वरदान ठरणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड साठी एक रुपयाची मदत केली नाही हा अर्थसंकल्प मराठवाड्यासाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रियाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड यांनी दिली.