मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) : बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन आणि मासिक जीवन गौरव तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार लातूरचे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार तथा विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना देण्यात आला.
सामाजिक,साहित्यिक, क्रीडा, संस्कृती व शैक्षणिक क्षेत्राला वाहिलेले मासिक जीवन गौरव हे औरंगाबाद आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना प्रत्येक वर्षी पुरस्कार देतात. सोळाव्या लोकसभेत अत्यंत चांगली कामगिरी केलेले लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांनी अनेक लोक उपयोगी कामे केलेली आहेत. प्रामुख्याने गायरान जमिनीवर राहत असलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांचे घरकुल नियमित करून देणे,एक लाखापेक्षा जास्त लोकांना उज्वला गॅस या योजनेचा फायदा करून दिला. लातूर लोकसभा मतदारसंघात हजारो वृद्ध कलावंतांना केंद्र सरकारचे पेन्शन सुरू करून दिले. मतदार संघातील कॅन्सर आणि हृदयविकार चे रुग्ण यांना प्रधानमंत्री सहायता निधीतून करोडो रुपये ची मदत मिळवून दिली.आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला कमी तिकीट दरात विशेष ट्रेन सुरू केली. लातूरला पासपोर्ट कार्यालय, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, पोस्टाचे विभागीय कार्यालय अनेक राष्ट्रीय महामार्ग ,अनेक नवीन रेल्वे गाड्या,रेल्वे बोगी कारखाना, रेल्वेनी लातूरकरांना पाणी आणले,लातूर टेंभुर्णी हायवेला नॅशनल हवे मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला. लोकसभेमध्ये प्रश्न मांडला. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेषता लातूर आणि नांदेड या ठिकाणी नीट परीक्षा सेंटर सुरू केले.असे अनेक समाज उपयोगी काम मतदारसंघात करून संसदेमध्ये अनेक विधेयकावर आपले मत मांडले. भारतीय संसदेत शंभर टक्के उपस्थिती संसदेच्या कामकाजामध्ये नोंदवली.केंद्र सरकार च्या राजभाषा स्थाई समितीवर कार्यकारी संयोजक म्हणून काम करताना संपूर्ण भारतात हिंदीत कामकाज झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. दक्षिण भारत आणि नॉर्थ ईस्ट इंडिया या भागामध्ये हिंदी चे कामकाज वाढण्यासाठी प्रयत्न केले.अशा अनेक कार्याची दखल घेऊन बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन आणि मासिक जीवनगौरव यांच्यावतीने आज औरंगाबाद येथे मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विश्व दलित परिषदेचे महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष एडवोकेट सिरिन वारे,भाई पंकज खरात ,भाई अरुण गडवे,भाई विशाल इंगळे, रणनितीकार एडवोकेट अविनाश जी आवटे,एडवोकेट गौतम त्रिभुवन, विश्व दलित परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख सागर वाघमारे,विश्व दलित परिषद महाराष्ट्र शाखा तृतीयपंथी आघाडीचे प्रमुख अल्ताफ शेख. आणि बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे संस्थापक, प्रख्यात साहित्यिक रामदास वाघमारे आदी उपस्थित होते. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author