साने गुरूजी कथामालेचा जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : साने गुरुजी कथामाला हेलस जिल्हा शाखा लातूर च्या वतीने आणि 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या 95 कथाकथनाच्या उपक्रमाअंतर्गत, जिल्हास्तरावर कथाकथन स्पर्धा अत्यंत उत्साहाचा वातावरणामध्ये संपन्न झाल्या. त्यात जिल्हास्तरावर सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटोळा तालुका चाकूर चे सहशिक्षक प्रमोद हुडगे , द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानवडा तालुका औसा च्या सहशिक्षिका शोभा माने,तर सर्व तृतीय महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालय लातूर च्या सहशिक्षिका महानंदा मुंडे यांना आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या सहशिक्षिका संगीता पाटील यांना विभागून देण्यात आले. नुकताच त्यांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल-श्रीफळ आणि पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कथेचे निरीक्षक म्हणून प्रा.कवि अनिल चवळे ,कवि राजसाहेब कदम यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक साने गुरुजी कथामालेचे जिल्हा समन्वयक रामलिंग तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन सविता पाटील यांनी तर आभार सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे यांनी मानले . विजयी स्पर्धकांचे अभिनंदन दलित मित्र डी बी लोहारे गुरुजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सानेगुरुजी कथामाला हेलस च्या मुख्य संयोजिका कल्पनाताई दत्तात्रेय हेलसकर, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, मुख्याध्यापक उद्धव संगारे ,पर्यवेक्षक उमाकांत नरडेले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱी यांनी केले.