विहरीत उडी मारून लातुर येथील तरूण तरूणी यांची आत्महत्या

विहरीत उडी मारून लातुर येथील तरूण तरूणी यांची आत्महत्या

अहमदपूर (प्रतिनिधि) : शहरापासुन जवळच असलेल्या नांदेड रोडवरील गुगदळ शिवारातील अभिजीत कराड यांच्या शेतातील विहरीत उडी मारून लातुर येथील तरुण तरुणी यांनी पळून येऊन आत्महत्या केल्याची घटना दि ११ मार्च रोजी घडली असुन सदरील घटनेची अहमदपूर पोलीसांत आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की लातुर येथील रहिवाशी असलेले संतोष सज्जनराव मादंळे वय 39 वर्ष व्यवसाय नौकरी रा . न्यु भाग्य नगर लातुर यांनी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे हजर होऊन माहीती दिली की , मी वरील प्रमाणे सदरील ठिकाणचा राहणारा असुन . मी लातुर येथे रेल्वे विभागा मध्ये सिनियर टेक्नीशिएशन म्हणुन काम करतो . मला एक भाऊ लक्ष्मण मादंळे असा असुन त्यांना पत्नी , दोन मुली नामे 1 ) सोनम वय 19 वर्ष ( मयत ) 2 ) नंदीनी वय 15 वर्ष व एक मुलगा नामे आर्यन असे असुन भाऊ हा अॅटो चालवुन कुंटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो . दिनांक 05 मार्च रोजी मुलगी सोनम ही 11.30 वाजण्याचे सुमारास ब्युटी पार्लला जात आहे असे सांगुन घराबाहेर निघुन गेली व दुपारी 03 वाजता तिला फोन करून कोठे आहे असे विचारले असता तिने विवेकानंद चौक लातुर येथे असल्याचे सांगितले व त्यानंतर ती त्या दिवशी परत घरी आलीच नाही म्हणुन आम्ही तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही म्हणुन आम्ही दि. 07 मार्च रोजी पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातुर येथे मिसीगंची तक्रार दिली.

त्यानंतर दि. 11 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजण्याचे सुमारास पोलीस स्टेशन अहमदपुर येथुन फोन आल्यानंतर कळाले की , 20 ते 22 वर्ष वयाचे एक मुलगा व एक मुलगी असे दोघेजण विहीरीत मृत अवस्थेत आहेत . त्यांचा ड्रेस कोड विचारला तेव्हा मुलीचा ड्रेस कोड हा आमचे मुलीशी जुळत असल्याने आम्ही पोलीस स्टेशन अहमदपुर येथे येवून गुगदळ शिवारात अभिजीत व्यंकटराव कराड यांचे विहीरीत जावुन पाहीले असता तेथे माझा भाऊ लक्ष्मण मादंळे यांची मुलगी नामे सोनम लक्ष्मण मादंळे वय 19 वर्ष रा . भाग्य नगर लातुर व मुलगा हा आमचे गल्लीतील अभिजीत केदार शिंदे वय 19 वर्ष रा . न्यु भाग्य नगर लातुर असे मयत अवस्थेत दिसले आहेत असल्याच्या खबरी वरून अहमदपूर पोलीसांत सदरील दोन्ही मयतांची आ.म्र.नं १५/ २२ कलम-१७४ सीआरपीसी प्रमाणे आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असुन दोन्ही प्रेताचे अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले

सदरील घटनेप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार, पोलीस उप- निरिक्षक बालाजी पल्लेवाड, पोकॉ प्रशांत किर्ते, पोना आरदवाड, पोना कावळे, पोना राजगीरवाड, पोहेका व्ही जी सन्मुखराव यांनी मदत केली. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक चिदांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरिक्षक प्रभाकर अंधोरीकर हे करीत आहेत

About The Author