नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिखरावर – उत्तरा कलबुर्गे

नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिखरावर - उत्तरा कलबुर्गे

उदगीर (प्रतिनिधी) : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. असे विचार भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तरा कलबुर्गे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भारतातील चार राज्यात नरेंद्र मोदी आणि योगीजी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या, त्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर आणि भारतीय जनता पक्षाच्या लोक कल्याणकारी भूमिकेवर शिक्कामोर्तब झाला आहे. असेही विचार त्यांनी स्पष्ट केले.
या आनंदाप्रीत्यर्थ तिरुपती बालाजी देवस्थान येथे जाऊन महिला आघाडीने जल्लोष व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तरा कलबुर्गे यांच्यासोबत सरोजा वारकरे, शशिकला पाटील, अनिता बिरादार, जया काबरा, जिल्हा सचिव बबिता पांढरे, जिल्हा सरचिटणीस प्रणिता बेंबळे, मंदाकिनी जीवने, उदगिर शहराध्यक्ष मधुमती कानशेट्टे, शहर सरचिटणीस आरती सूर्यवंशी, सोमनाथपूर ग्रामपंचायत सदस्य शिवकर्णा आंधारे, माजी तालुकाध्यक्ष उषा माने ,तालुका उपाध्यक्ष अरुणा बेळकोने, अक्का महादेवी पाटील इत्यादी महिला उपस्थित होत्या. भारतीय जनता पक्षाच्या यशामागे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम हेच असल्याचेही या प्रसंगी पुन्हा एकदा उत्तरा कलबुर्गे यांनी स्पष्ट केले.

About The Author

error: Content is protected !!