रोटरी क्लब अहमदपूरच्या अध्यक्षपदी जीवन कापसे तर सचिवपदी कपिल बिरादार

रोटरी क्लब अहमदपूरच्या अध्यक्षपदी जीवन कापसे तर सचिवपदी कपिल बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वतः च्या खर्चातून समाज सेवा करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाभावी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोटरी क्लब अहमदपूर च्या 2022-23 च्या अध्यक्षपदी रो. जीवन कापसे तर सचिव पदी रो. कपिल बिरादार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दि. 11 मार्च रोजी रोटरी क्लब च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली. अहमदपूर रोटरी क्लब 33 वर्ष जुना असून रोटरीच्या नियमानुसार दरवर्षी सभासद कार्यकारणी बदलली जाते त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव हे 34 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आत्तापर्यंत अहमदपूर रोटरी च्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणासाठी फार मोठे योगदान दिले आहे. या क्लबमध्ये डॉक्टर, व्यापारी, प्राध्यापक शिक्षक, सामाजिक सेवेत आवड असणारी विविध क्षेत्रातील सभासद मंडळी आहेत. या निवडीच्या वेळी रो.महेंद्र खंडागळे, रो.डॉ नंदकुमार गुणाले,रो.सचिन करकनाळे, रो. प्रा. अनिल चवळे, रो.नजीब पठाण, रो.भरत इगे उपस्थित होते. या निवडीबद्दल रोटरी क्लबमधील सर्व सभासद व विविध क्षेत्रातून नूतन अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!