राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या चार फेंसरची निवड

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या चार फेंसरची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : औरंगाबाद येथे पार पडलेल्या 23 व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेत लातूरच्या साईप्रसाद जंगवाड याने ईपी या प्रकारात सुवर्णपदक पटकावले, जानवी जाधव हिने ईपी या प्रकारात रौप्य पदक पटकावले, साक्षी गोरगीळे हिने सायबर या प्रकारात रौप्यपदक पटकावले , वैभवी माने हिने ईपी या प्रकारात कांस्यपदक पटकावले. साईप्रसाद जंगवाड याने नेत्रदीपक खेळ करून अंतिम फेरीत 10-1 बुलढाण्याच्या खेळाडूस पराभूत करून यश संपादन केले .जानवी जाधव हिने सेमीफायनल या सामन्यांमध्ये वैभवी माने या दोन्ही लातूरच्या खेळाडूंचा सामना झाला त्यामध्ये जानवी हिने 10 – 8 वैभवी ला पराभूत करून रौप्य पदक प्राप्त केले. वैभवि माने हिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले . साक्षी गोरगीळे सायबर प्रकारांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेळाडूस 10- 8 ने पराभूत करून रोप्य पदक प्राप्त केले चारही खेळाडू छत्तीसगड येथील रायपुर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना आकाश बनसोडे,बबलू पठाण, रोहित गलाले यांनी मार्गदर्शन केले. विजय खेळाडूंचे अभिनंदन लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. अभिजित मोरे सर, सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले सर लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सदस्य काझी वजीरोद्दिन, वैभव कज्जेवाड, तसेच मु.अ. प्रशांत माने सर, ज्ञानोबा भोसले सर, कृष्णा शिंदे,जयदीप नागरगोजे आदींनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!