लसाकमचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने संघटनेचा वर्धापन दिन ( १२ मार्च)उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे माजी सभापती ॲड. टि.एन.कांबळे तर व्यासपीठावर जेष्ठ विधिज्ञ ॲड. आर.एस.वाघमारे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त उत्तमराव माने, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव जंगापल्ले, मुख्याध्यापक ग्यानोबा घोसे, बी.एम.जंगापल्ले, लसाकमचे तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे, प्रा.दिलीप भालेराव, सुग्रीव बेले आदीची प्रमुख उपस्थिती. प्रारंभीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. मनोगत व्यक्त करून लसाकम वर्धापन दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड.वाघमारे म्हणाले की, एका ध्येयाने, एका विचाराने प्रेरित होऊन लसाकमचे कर्मचारी काम करत आहेत.उत्तमराव माने यांनी परिवर्तनाच्या चळवळीतील कर्मचारी व कार्यकर्ता यांनी सजग राहून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोपात ॲड.टि.एन कांबळे यांनी महापुरुषांचे विचार समाजास तारून नेतील. महापुरुषांच्या विचारांचा वारसा लसाकम चालवित आहे असून महापुरुषांचे विचार समाजास तारून नेतील असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभार जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी केले. यशस्वीतेसाठी माधवराव कांबळे,शिवाजी कांबळे, विश्वांभर जिवारे, मनोज जाधव, मारोती बोलेवाड, विठ्ठल जुब्रे, गोपीनाथ कांबळे आदींनी परीश्रम घेतले.
