माझ्या जीवनातील तेजस्वी तारे’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

माझ्या जीवनातील तेजस्वी तारे' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा परिषद प्रशाला खंडाळी येथील मुख्याध्यापक बबनराव गुळवे लिखित ‘माझ्या जीवनातील तेजस्वी तारे’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शहरातील विराज गार्डन येथे प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.नारायण कांबळे तर व्यासपीठावर कवी राजेसाहेब कदम,लेखक बबनराव गुळवे आदीची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला शिक्षक भगिनींना नारीरत्न पुरस्कार, शिक्षक बांधवाना शिक्षक रत्न, वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लेखक अरविंद जगताप यांनी गणिताचा शिक्षक लेखक असतो हे पहिल्यांदाच अनुभवोय असे गौरवोद्गार काढले.कवी राजेसाहेब कदम यांनी कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.डॉ.नारायण कांबळे यांनी अध्यक्षीय समारोपात लेखन व वाचन संस्कृती कमी होत असल्याची खंत व्यक्त केली.नवनवीन साहित्य निर्माण करण्याची धमक शिक्षकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक रणजित चौधरी यांनी तर सुत्रसंचालन गोपाळ गुट्टे तर आभार बंकटराव जाधव यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, शिक्षक सेना, जुनी पेन्शन हक्क संघटना आदी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!