आदर्श शेतकरी म्हणून धानोरा येथील सहदेव होनाळे यांचा सपत्निक सन्मान
अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे होनमाळ ,साकोळ ता शिरुर अनंतपाळ जिल्हा लातुर येथे कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद लातुर यांच्या वतीने लातुर जिल्ह्यातील आदर्श शेतकरी व आदर्श पशुपालक यांचा शाॅल, स्मृती चिन्ह,सन्मापत्र व साडीचोळी देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला यावेळी अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे यांचा सपत्निक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलगुरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, जिल्हा परिषद सदस्या मुद्रीकाताई भिकाणे यांच्या सह जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव व कृषी व पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
