यशवंतच्या एस एस सी च्या विद्यार्थ्यांना निरोप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

यशवंतच्या एस एस सी च्या विद्यार्थ्यांना निरोप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंत विद्यालयाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या एस एस सी च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भावपूर्ण निरोप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव तथा दलित मित्र डी बी लोहारे गुरुजी होते. विशेष अतिथी म्हणून कोठा पॅटर्न नांदेडचे संचालक प्रा. राजू सूर्यवंशी, लातूर नांदेड अराईज चे संचालक प्रा. अजय प्रताप सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, उपप्राचार्य प्रा. बालाजी गोडभरले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे ,कोटाचे समन्वयक कयूम शेख, प्रा. रवी ईरफळे सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. राजू सूर्यवंशी, प्रा. अजय राजसिंग, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. या समयी विद्यार्थ्यांच्या वतीने शिवपूजा दहिफळे, उत्कर्षा होनराव ही चे मनोगत पर भाषणे झाली तर प्रा. रवि ईरफळे आणि कपिल बिराजदार यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मानले. या सोहळ्याचे औचित्य साधून दहावीच्या सराव परीक्षेतील 90 टक्के च्या पुढे टक्केवारी घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रंथ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!