जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर यश प्राप्ती करावी – रामलिंग तत्तापुरे

जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर यश प्राप्ती करावी - रामलिंग तत्तापुरे

अहमदपूर (गोविंद काळे) : जगामध्ये सद्यस्थितीला जीवघेणी स्पर्धा वाढलेली असून जगासमोर कोरोना सारखी महाभयानक संकट उभे आहेत. या सर्वांचां समर्थपणे मुकाबला करण्या साठी विद्यार्थ्यांनी नवे आव्हानं स्वीकारून जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि मुक्त अभ्यास च्या जोरावर यशप्राप्ती करावी असे प्रतिपादन मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री रामलिंग तत्तापुरे यांनी केले. दि. ११ रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उध्दव श्रंगारे व्यासपीठावर राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आशा रोडगे लिनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर सह सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीना तोवर,संगीता आबंदे यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली. तर विद्यार्थ्यांच्या वतीने कोमल इप्पर ,श्रद्धा सूर्यवंशी, रूपाली कांबळे यांचे मनोगत पर भाषणं झाली. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे यांनी केला. प्रास्ताविक वर्गशिक्षक अर्चना जांभळदरे यांनी सूत्रसंचालन संस्कृती वाघमारे यांनी तर आभार सुजाता बुरगे यांनी मांडले. पसायदाना नंतर निरोपाचा सोहळा समाप्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!