अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाज प्रबोधनी गुणगौरव सोहळा संपन्न

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाज प्रबोधनी गुणगौरव सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : विश्वामध्ये ज्यांच्याकडे आई-वडील वास्तव्यात आहेत. ते सर्वात मोठे असल्याचे सांगून आपल्या लाडक्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आई-वडील हे विश्वातील मोठे विद्यापीठ असल्याचे आग्रही प्रतिपादन प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांनी केले.
दि. 13 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचायत समिती च्या सभागृहामध्ये आयोजित विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा समाज प्रबोधनी पुरस्कार सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाबासाहेब पाटील प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाढ, पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे, नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, नगरसेविका अनुराधा नळेगावकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. धीरज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीद, ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक उद्धव इप्पर, एड. नाथराव देमगुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर बागवान, डॉ. ललिता किनगावकर, सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले की माय बाप कोणतेही नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात .या जगात खरे संस्कार मायबापाच्या सानिध्यात घडतात. त्यामुळे प्रत्येक घरात मायबापांना सन्मानाने जपा, त्यांचं असं म्हणजे कुबेराची संपत्ती असल्याचे सांगून नेहमी पेशाची प्रामाणिक आणि सचोटीने वागा, परिवाराशी संवाद ठेवा ,एकोपा ठेवा, आई-वडिलांच्या त्यागाचे चीज करा असे जाहीर आवाहन केले.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की घरामध्ये महिलांचा सन्मान फक्त जागतिक महिला दिनी न करता दररोज सन्मान करा निसर्गाने तिच्याकडं नवनिर्मितीची देणगी दिली असल्याचे सांगून ती भित्री जरी असली तरी ती दयाळू व प्रसंगी कठोर आहे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी म्हणून स्त्रियांचा सन्मान करा असे जाहीर आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी सत्कारमूर्ती नारी उषाताई भोसले साहित्यक, नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांचे मनोगत वर भाषणे झाली.
प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मेघराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.
कार्यक्रमाचा शुभारंभ शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रत्नाकर नळेगावकर, डॉ जयप्रकाश केंद्रे, इमरोज पटवेकर, उमाकांत चलवदे, शेषराव कांबळे ,रामराव केंद्रे, गणेश सूर्यवंशी, संदीप गायकवाड, सुरेख उपरवाड, शुभांगी खेडकर, वर्षा माळी, पल्लवी गायकवाड, अंजलीताई वाघबर, पूजा गायकवाड सह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाज प्रबोधिनी पुरस्काराचे मानकरी खालील महिला होत.
मंगला मस्के बीड, कलावती  भातांब्रे,वनिता वाघमारे उदगीर, लातूरमंजू निंबाळकर,लातूर उषा भोसले, माही आरदवाड, नूतन  केंद्रे राणीसावरगाव, अंजुम काजी, सुजाता तावडे पुणे, शिल्पा गीते निलगा, अनुसया पांचाळ  , विजया भुसारे,अंबाजोगाई जना मोरे, सुप्रियाताई पांढरे परभणी,रेखा पांचाळ, एड. पुनम भराडिया अहमदपूर , मयुरी जाधव,लता लोभे लातूर यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी या अंनिसचे कार्यकर्ते तालुक्यातील समविचारी व  महिला  पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!