ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी च्या उज्वल यशाची पुन्हा एकदा उंच भरारी

ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी च्या उज्वल यशाची पुन्हा एकदा उंच भरारी

अहमदपूर (गोविंद काळे) : ज्ञानदीप अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उंच भरारी मारत नागपूर भरती मध्ये तीन विद्यार्थ्यांचे सलेक्शन झाले आहे. ज्ञानदीप अकॅडमीची विद्यार्थी 2019 चे अंतर्गत झालेल्या पोलीस भरतीत नागपूर येथे 3 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यामध्ये शिवहार कल्याणकर, ज्ञानेश्वरी नागोराव भोरगिर, ज्योती विठ्ठलराव गवते या विद्यार्थ्यांची नागपूर पोलीस मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल अकॅडमीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करून व पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

ज्ञानदीप अकॅडमी हे खासियत आहे की येथे ग्राउंड व लेखी परीक्षेची तयारी करून घेणारे तज्ञ व अनुभवी असा शिक्षकवृंद आहे तसेच ग्राउंड मध्ये हे तज्ञ व्यक्ती आपले स्वतःचे अनुभव व स्वतःची मेहनत पणाला लावतात याचा आरसा म्हणजे काल लागलेले नागपूरचे विद्यार्थी आहेत. नागपूर येथे झालेल्या भरती मधील तिन्ही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी ज्ञानदीप मध्ये घेतलेल्या आपल्या अनुभवा बद्दल माहिती देताना म्हटले की शिवहार यांनी आपल्या मनोगातून म्हटले की मी तेथे आलो तेव्हा मला ग्राउंड अजिबात जमत नव्हते पण येथिल ग्राउंड चे प्रशिक्षक यांची ग्राउंड घेण्याची जी पद्धत आहे त्यामूळे माझे ग्राउंड खुप चांगले झाले व मला 50 पैकी 48 मार्क मिळाले.

ज्ञानेश्वरी व ज्योती म्हणल्या की येथिल ग्राउंड तर खूप चांगले आहे व लेखिची तयारी करुन घेणारे शिक्षक समजून सांगण्याच्या ट्रिक्स या मुले लवकरात लवकर कसे उत्तरं काढता येईल असे शिकवल्यामुळे कमी वेळेत उत्तरं शोधता येते. मुलींसाठी ज्ञानदीप अकॅडमी एवढी सुरक्षित अकॅडमी कुठच मिळू शकत नाही. अकॅडमी चे संचालक हे फॅमिली सोबत येथे असतात दोन महीला प्रशिक्षक येथेच निवासी असतात त्यामूळे मुलींना खुप सुरक्षित वाटते आणि मुलींना जिथे सुरक्षितता असते तेथे प्रगती करण्यासाठी काहीच अडचण नसते. म्हणुन आम्ही ज्ञानदीप अकॅडमी चे ऋणी आहोत. असे मनोगत व्यक्त केलें.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने नागपूर पोलीस भरती लागलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author

error: Content is protected !!