साहित्यसंमेलन आले अहमदपूरकरांच्या दारी

साहित्यसंमेलन आले अहमदपूरकरांच्या दारी

अहमदपूर (गोविंद काळे) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने ‘संमेलन आपल्या दारी’या उपक्रमाचे उद्घाटन अहमदपूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात संपन्न झाले.कथाकार धनंजय गुडसूरकर यांच्या कथेने एका डोळ्यात आसू अन दुसऱ्या डोळ्यात हसू असे चित्र उभे राहिले. प्रसिद्ध विचारवंंत प्रा.डॉ .भूषणकुमार जोरगुलवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर होते तर व्यासपीठावर संस्थेचे समन्वयक कुलदीपक हाके, राम तत्तापूरे, प्रा.अनिल चवळे,मुख्याध्यापक आशा रोडगे, मु.अ.उद्धव श्रंगारे,लिनेस क्लब च्या अध्यक्षा मिना तोवर उपस्थित होते. मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.निता मोरे यांनी संमेलनाच्या उपक्रमाविषयी व विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी माहिती दिली.यावेळी धनंजय गुडसूरकर यांनी सादर केलेल्या ‘न झालेली चोरी ‘ या कथेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हासू व डोळ्यात आसू आणले.”अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने हा कथाकथनाचा उपक्रम ख-या अर्थाने संमेलनाला सामान्यापर्यंत घेऊन जात आहे” असे प्रतिपादन प्रा.डॉ .भूषणकुमार जोरगुलवार यांनी केले. यावेळी सुरेखा गुजलवार यांनी मनोगत व्यक्त केले.संगिता आबंदे यांनी सुत्रसंचालन तर त्रिगुणा मोरगे यांनी आभार मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!