देहूगावात एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

देहूगावात एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

पिंपरी (प्रकाश इगवे) : एटीएम कार्डची अदलाबदल करून आर्थिक फसवणूक केली. देहू आळंदी रस्त्यावरील देहूगाव बाजारासमोरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये रविवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मयूरी गोविंद सूर्यवंशी (वय २२, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार फिर्यादी हे देहूगाव बाजारासमोरील एटीएममध्ये पैसे काढत होते. त्यावेळी दोन चोरटे आले. त्यांनी डेबिट कार्ड हातचलाखीने अदलाबदली केली.

About The Author

error: Content is protected !!