फुटाणे मॅडम उत्कृष्ट कार्य करतील – बालिका मुळे

फुटाणे मॅडम उत्कृष्ट कार्य करतील - बालिका मुळे

लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लातूर जिल्हा शिक्षक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,लातूर जिल्हा कां.चे सरचिटणीस धनंजय शेळके,लातूर जिल्हा शिक्षक कां.महिला अध्यक्ष-बालिका मुळे,महाराष्ट्र राज्य ललित कला शिक्षक संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्री गणेश राठोड , श्री भोसले ,श्री महेंद्र शिरसाठ उपस्थितीत सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना लातूर जिल्हा हा शिक्षण क्षेत्रात आग्रेसर आहे,प्राथमिक शिक्षण आधीकरी म्हणून वंदना फुटाणे मॅडम उत्कृष्ट कार्य करतील असा विश्वास बालिका मुळे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी वंदना फुटाणे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न, अडचणी दूर करून, सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देऊन, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

About The Author

error: Content is protected !!