गरजु महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मदतीचा हात म्हणून शिलाई मशीनचे वाटप

गरजु महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मदतीचा हात म्हणून शिलाई मशीनचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी) : महिलांनी, महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे हे खरे महिला सबलीकरण होईल. याच हेतूने महिला सप्ताह अंतर्गत इनरव्हील क्लब उदगीर यांनी कुटूंबाचा गाडा स्वतः च्या जीवावर पुढे रेटणार्‍या चार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचा छोटा प्रयत्न केला. तूमच्या या मदतीमुळे आम्ही आमचे व आमच्या लेकरा बाळांचे पोट भरू, त्यासाठी शिलाई काम करुन स्वतः चे घर चालवू ,तुमची ही मदत आमच्या साठी लाखमोलाची आहे.अशा भावना या वेळी या गरजु महिलांनी व्यक्त केल्या.या उपक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख होते सौ सुहासिनी सुरशेटवार आणि सौ मीरा चंबुले (अध्यक्षा, इनरव्हील क्लब उदगीर) याच बरोबर सौ स्वाती गुरुडे, (उपाध्यक्ष , इनरव्हील क्लब उदगीर),सौ पल्लवी मुक्कावार (एडिटर, इनरव्हील क्लब उदगीर),सौ मानसी चन्नावार (कोषाध्यक्ष,इनरव्हील क्लब उदगीर),सौ स्नेहा चणगे (आय एस ओ इनरव्हील क्लब,उदगीर) व सौ अश्विनी संजय देशमुख ( सदस्य इनरव्हील क्लब उदगीर) यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!