आई प्रतिष्ठान, इनरव्हिल क्लब व महिला पतंजलीच्या वतीने योग शिबिराचे आयोजन

आई प्रतिष्ठान, इनरव्हिल क्लब व महिला पतंजलीच्या वतीने योग शिबिराचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील चामे गार्डन येथे आई प्रतिष्ठान, इनरव्हिल क्लब व महिला पंतजलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नुकतेच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरामध्ये महिलांना योग प्राणायाम, कपाल भाती, भस्त्रीका ,अनुलोम विलोम ,भ्रामरी प्राणायाम, यूदम व्यायाम यासह सुर्य नमस्कार शिकवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरवातील आई प्रतिष्ठानच्या वतीने प्रमुख पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले.

आई प्रतिष्ठानच्या वैशालीताई चामे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,महिला योग पतंजलीच्या भ्राताबें मॅडम व वतने मॅडम यांची गेल्या आठ वर्षांपासून आम्हाला मोलाची साथ लाभली व योगाच्या माध्यमातुन त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत राहीले आहे तसेच इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ.वर्षा भोसले , आरोग्य अधिकारी डॉ मणकर्णा चिंवडे पाटील यांनी योग शिबीरास जमलेल्या महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश यांची पत्नी सौ . निविदीता ठाकरे माजी नगरसेविका सौ.रजनीताई रेड्डी सौ . सुनिता गुणाले , सौ . अनिता ओस्तवाल महिला योग पतंजलीच्या सौ.ठाकूर मॅडम, सौ.शुभांगी पस्तापूरे मॅडम, सौ.पवार मॅडम, सौ.चवळे मॅडमआदीची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे तसेच जमलेल्या महीलांचे आभार व्यक्त करताना वैशालीताई चामे म्हणाल्या की, आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीरीत्या योग शिबिराचे आयोजन करु शकलो म्हणून सर्वांचे आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!