देशमुख अब्दुल गफूर हकानिमिया यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद जिल्हा लातूर पुरस्कार सोहळा १३ मार्च रोजी रविवारी ११:०० वाजता कै.दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड लातूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला असुन अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अल – कादिर- उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक देशमुख अब्दुल गफूर हकानिमिया यांचा खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ( अध्यक्ष सैनिक फेडरेशन , भारत ) यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव मार्गदर्शक पंडित धुमाळ ( माजी अध्यक्ष जि.प.लातूर ) मुख्य अतिथी सुरेश पवार ( माजी महापौर म.न.पा. लातूर ) विशेष अतिथी प्राचार्य , पि . एन . सगर ( मुल्यांकन तज्ञ , NAAC बेंगलूर , भारत ) यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वसंत वाडीकर ( जिल्हा अध्यक्ष म . फुले शिक्षक परिषद लातूर ) पठाण एजाजखान , पठाण बिलाल खान , संग्राम कांबळे , शकील देशमुख , करीम कुमठेकर , बशीर कुमठेकर , देशमुख अली हुसेन , उमाकांत सूर्यवंशी , चांदपाशा चौधरी , अक्षय गुळवे , प्रदीप भोसले , बाळू हत्ते आदी मान्यवर व मित्रमंडळ यांची उपस्थिती होती
