श्री शॉपींग झोन वर्धापन दिन कार्यक्रमास आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील शिवपूजे कॉम्पलेक्स, थोडगा रोड, अहमदपूर येथे आयोजित प्रविण भुतडा अँड असोसिएट्स श्री शॉपींग झोन १४ वा वर्धापन दिन आणि मुक्ताई डेन्टल क्लिनीकच्या ११ वा वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटिल यांनी उपस्थित राहून. यावेळी प्रविण भुतडा आणि मुक्ताई डेन्टल क्लिनीक यांना व्यवसायात यशस्वी वाटचाल केल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
यावेळी भगिरथ भुतडा, ईश्वर भुतडा, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि.प सदस्य माधवराव जाधव, दिनेश पाटील, निलेश पाटील, भारत उडतेवार, डॉ.उडतेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
