जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे जनजागृती कार्यक्रम

जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे जनजागृती कार्यक्रम

अहमदपूर ( गोविंद काळे ) : जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च हा सर्वत्र साजरा साजरा केला जातो . अहमदपूर तहसिल कार्यालयात बुधवारी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविन फुलारी (उपविभागीय अधिकारी अहमदपूर)प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी (तहसीलदार अहमदपूर) दत्ता मिरकले (जिल्हाध्यक्ष अ .भा .ग्राहक पंचायत लातूर), चंद्रप्रकाश हंगे (तालुकाध्यक्ष अ .भा . ग्राहक पंचायत अहमदपूर), मोरे (नायब तहसीलदार पुरवठा विभाग अहमदपूर), अव्वल कारकून बालाजी इंगळे , दत्तात्रेय निलावार, बालाजी पडोळे ( अ भा . ग्राहक पंचायत तालुका उपाध्यक्ष ) ग्राहक पंचायत तालुका शाखेचे सचिव ज्ञानेश्वर कदम आदीसह तहसील कार्यालयातील कर्मचारी , व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दिलीप पाटील, दिलीप कांबळे, मिरा बनसोडे व इतर पदाधिकारी व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी प्रविन फुलारी यांनी मार्गदर्शन प्रसंगी म्हणाले शासणाच्या आदेशाप्रमाणे ग्राहकांचे हक्क जबाबदार्या व त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या विविध शासकिय यंत्रणा फेअर डिजिटल फिंगर्स हि संकल्पना निश्चित केली आहे . या संकल्पनातून अहमदपूर तालुका स्तरावर ग्राहक जनजाग्रती परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा प्रबोधनावर माहीती दिली . तसेच तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, ग्राहक पंचायत चे पदाधिकारी व रेशन दुकानदार यांचेही मार्गदर्शन झाले . कार्यक्रमाचे सुगसंचलन व आभार काचे यांनी केले . यावेळी मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!