कै. मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयात स्नेहमेळावा संपन्न
शिरूर ताजबंद ( गोविंद काळे ) : येथील कै. मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयात सन १९९०-९२च्या बॅच मधील अध्यापक विद्यालयाच्या वर्गमित्राचा स्नेहमेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष बळीराम भिंगोले गुरूजी, सिध्दी शुगर चे व बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुरजभैय्या पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी या जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते अध्यापक विद्यालयातील चालू बॅचच्या विद्यार्थ्यांना टिईटीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके वाटप करण्यात आली. सन ९०च्या बॅचमधील ८० विद्यार्थ्यापैकी ७९ विद्यार्थी नौकरीला लागले असुन या सर्वांचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी अभिनंदन केले. तसेच आमदार साहेब यांच्यातर्फे येथील वाचनालयास अभ्यासक्रमाचे संच भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य एन.एस. पाटील, प्राचार्य कर्डिले, प्रा.द.मा.माने, माजी प्राचार्य ढोकाडे, व्ही. पी.शिंदे, बिरादार सर, जंगापल्ले सर शिंदे व त्या वर्षाची सर्व वर्गमित्र उपस्थित होते. तसेच यामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्मक्रमामध्ये जुन्या आठवणींचा उजाळा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पाटील सर तर आभार संजय रोडगे सर यांनी मानले.
