गावठी हातभट्टी विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध
पुणे (रफिक शेख) : शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिर गावठी हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्या नुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध तेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 61 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
चंद्रकांत उर्फ चंदर बासु चव्हाण( वय 49 रा. बालाजी निवास के. के. मार्केट गेट नं. नाल्याजवळ बालाजीनगर पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारा चे नाव आहे. चंद्रकांत उर्फ चंदर चव्हाण याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षा करीता स्थान बद्ध करण्यात आले आहे. चद्रकांत उर्फ चंदर चव्हाण हा अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार असुन सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारां च्या मदतीने बेकायदेशिर गावठी हातभट्टी दारुची विक्री करत होता. याप्रकरणी त्याच्यावर 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्यास जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. तसेच या भागात त्याची दहशत असल्याने नागरिक त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यास धजावत नाहीत. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागद पत्राची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चंद्रकात उर्फ चंदर चव्हाण याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध तेची कारवाई करण्याचे आदेश दिले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती. पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरिक्षक वैशाली चांदगुडे यांनी हि कामगीरी केली. पोलीस आयुक्तानी मागील एक वर्षात 61 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांरावर अशा प्रकार ची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांन कडुन सांगण्यात आले आहे. गुन्हें गारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.