भरदिवसा तरुणावर कोयत्यान सपासप वार करून खून

भरदिवसा तरुणावर कोयत्यान सपासप वार करून खून

पुणे (रफिक शेख) : धायरी सिंहगड रस्त्यांवरील नांदेड फाटयाजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करून हत्या केली आहे. मारूती लक्ष्मण ढेबे( वय २३ वर्ष सध्या रा. वारजे मुळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरीकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मारूती ढेबे हा नांदेड फाट्यापासुन नांदेड गांवा कडे जाणाऱ्या रस्त्याला लागुन असलेल्या बालाजी स्क्रैप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला.या टोळक्याने मारूती ढेबे वर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यु झाला. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारने पसार झाले. हि संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. वर्दळीचा रस्ता तसेच सायंकाळ ची वेळ असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. परिसरातील नागरीक आणि व्यवसायीकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहीती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदिप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी ससुन रूग्णालयात पाठवण्यात आला असुन हवेली पोलीसांकडुन हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. पूर्वंवैमनस्यातुन हि हत्या झाली असुन याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना हवेली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींच्या शोधार्य पोलीस पथक रवाना झाली आहेत.

About The Author

error: Content is protected !!