दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; व्यावसायिकाला मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; व्यावसायिकाला मारहाण

पिंपरी (प्रकाश इगवे) : दारू पिण्यासाठी पैसे दें असे म्हणून व्यावसायिक असलेल्या तरुणाच्या खिशातून २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मारहाण करून तरुणाला धमकी दिली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी येथे सोमवारी (दि. २१) रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत विजयकुमार रामचंदानी (वय २५, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सनमान घोरपडे (वय ३२), गौरव घोरपडे (वय ३५, दोघेही रा. पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी गौरव घोरपडे याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी सनमान याने फिर्यादीला थांबवून फिर्यादीजवळ जाऊन त्यांच्या गळ्यात हात घातला. तू माझ्याबरोबर चल नाही तर तुझ्याकडे बघून घेतो, असे म्हणून आरोपी सनमान याने फिर्यादीला धमकी दिली. मी सनमान वसंत घोरपडे माझे नाव कोणालाही विचार तुझ्याजवळ किती पैसे आहेत मला दारू पिण्यासाठी पैसे दे, असे आरोपी सनमान म्हणाला. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी घरी जात असताना आरोपी। गौरव याने फिर्यादीला मारहाण केली.

About The Author

error: Content is protected !!