बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे (रफिक शेख) : ताडीवाला रोड येथील एका ११ वर्षाच्या मुलीवर बाप, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असताना आता सावत्र बापच नराधम बनल्याचे प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापाने गेल्या ४ वर्षांपासून १६ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ही घटना वडगाव शेरी व वाघोली येथील दोन सोसायटींमध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान आणि २०१९ ते २०२० दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना त्याने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.