महात्मा फुले महाविद्यालयात शहिदांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात शहिदांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान योद्धे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेला उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे, डॉ. दत्तात्रय चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, सुशील बिरादार, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!