राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा दिवस कार्यक्रम साजरा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा दिवस कार्यक्रम साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका योजने अंतर्गत संस्कृती मंगल कार्यालय येथे दि.22 मार्च रोजी आशा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची तर अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालययाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बिराजदार यांची उपस्थिती होती अमोलकुमार आंदेलवाड गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल दासरे तालुका आरोग्य विस्तार अधिकारी लटपटे मॅडम, तालुका सुपरवायझर पवार प्रा आ केंद्र अंधोरी वैद्यकीय अधिकारी डॉ जयप्रकाश केंद्रे प्रा आ केंद्र शिरूर ताजबंद वैद्यकीय अधिकारी डॉ शरद गिरी, नागरी दवाखाना रोकडा सावरगाव वैद्यकीय अधिकारी रेचवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल दासरे यांनी केले .

सदर कार्यक्रमास सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व नियमित कार्यक्षेत्रात भेटी तसेच ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा कार्यकर्ती यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सन 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांचा आशा पुरस्कार (सन्मान पत्र व सन्मान चिन्ह) देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमातंर्गत आशाचे सांस्कृतिक कार्यक्रम वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य आशा व गट प्रवर्तक यांनी केले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचलन गारोळे मॅडम गटप्रवर्तक शिरूर ता. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य विभागातील तालुका लेखापाल कपीकीरे तालुका डाटा ऑफरेटर वाघमारे आदींनी मदत केली तर आभार प्रदर्शन तालुका समुह संघटक बानापुरे यांनी मानले या कार्यक्रमासठी गटप्रवर्तक यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!