सेवाभावी संस्था सेलू अंतर्गत राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे वितरण

सेवाभावी संस्था सेलू अंतर्गत राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे वितरण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिवन ज्योती पॅरामेडीकल सायन्स इन्सीट्युट चौंडा नगर येथे दि. 20 मार्च रोजी राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था सेलू अंतर्गत राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बालाजी आचार्य हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्ञानाची ज्योत पेटवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था सेलू अंतर्गत व निडको ईडीबी प्रशिक्षण केंद्र अहमदपूरच्या वतीने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब व जिल्हा परिषद सदस्य लातूर माधवराव जाधव यांना ( विकासरत्न पुरस्कार ) देण्यात आला. अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करत असलेल्या मान्यवरांचा समाजभुषन , कलारत्न , जिवनगौरव , आदर्श पत्रकारिता, समाजसेवक असे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी श्री देवीदास मारोती कांबळे (समाजभुषन पुरस्कार), श्री वामन प्रभु जाधव (समाजभुषन पुरस्कार), श्री शरद चंद्रकांत तळेकर (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), प्रा. बालाजी आचार्य (समाज भुषन पुरस्कार), दिपक माधवराव कांबळे (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), शालू सुदाम तरमुडे (आदर्श जिवन गौरव पुरस्कार), वंदनाताई अण्णाराव केंद्रे (विकासरत्न पुरस्कार ), अनिता पिंपळे मॅडम (समाजभूषण पुरस्कार), डाॅ. सदाशिव मारोती केंद्रे (समाजरत्न पुरस्कार), अरुण विश्वनाथ केंद्रे (न्यायरत्न पुरस्कार), युवराज भगवान बदने (समाजसेवक पुरस्कार), दगडू ढवळे (कलारत्न पुरस्कार), अतुल मुळे (गुणवंत शिक्षणरत्न पुरस्कार) आणाराव सूर्यवंशी, महेंद्र ससाणे, देविदास कांबळे, शरद चेके आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी सुभाष साबळे यांनी केले व संस्थेच्या विविध कामाची कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितले की पुरस्कार मिळाल्या मुळे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते व काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो.. पुरस्कार हा कोणालाही दिला जात नाही तर समाजात चांगले काम करणा-या व्यक्तीचा सन्मान म्हणून पुरस्कार दिला जातो त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी समाजाचे काम ताकदीने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत बालाजी आचार्य यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी समाजजीवनावर प्रकाश टाकत आपण सर्वांनी समाजपयोगी असेच कार्यक्रम घेऊन समाजाला एक आदर्श निर्माण करून दिला आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद तात्या हेंगणे ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर), ॲड. टि. एन कांबळे (माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद लातूर), श्री निवृत्ती कांबळे (उपाध्यक्ष महेश अर्बन बॅंक अहमदपूर), श्री आशिष तोगरे ( युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूर) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. लता गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवराज भगवानराव बदने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य वसंत मोडके ,कृष्णा होले व इतर सहकाऱ्यांनी मदत केली

About The Author

error: Content is protected !!