ट्रक अडवून चालकास २५ हजार रुपयांची मागितली खंडणी; दोघांना अटक

ट्रक अडवून चालकास २५ हजार रुपयांची मागितली खंडणी; दोघांना अटक

पुणे (रफिक शेख) : ट्रक अडवून चालकाकडे २५ हजार रुपयांची मागणी खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. मावळ तालुक्यातील उर्से येथे महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर बुधवारी (दि. २३) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. मिथुन अंकुश शेळके (वय २७, रा. वारंगवाडी, ता. मावळ), जावेद अब्दुल बागेवाडी (वय ४२, रा. दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हनुमंत भगवान बोराडे (वय ४०, रा. सावंतनगर, भोसरी) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक असून ते बुधवारी उर्से येथील महिंद्रा कंपनी येथे माल उतरवण्यासाठी ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीचा ट्रक अडवला. आमच्या गावाच्या हद्दीतून ट्रक चालवायचा असेल तर पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ व दमदाटीही केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

About The Author

error: Content is protected !!