बदलीसाठी पोलिसांकडून पैसे उकळणारा जेरबंद

बदलीसाठी पोलिसांकडून पैसे उकळणारा जेरबंद

पिंपरी (रफिक शेख) : पोलीस आयुक्तालयातून पोलीस निरीक्षक बोलत असल्याचे सांगून बदलीसाठी पोलीस आयुक्तांच्या नावाखाली महिला हवालदाराकडून पैसे उकळणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कोल्हापूर येथे जेरबंद केले. त्याच्यावर राज्यात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल आहेत. अमित कांबळे (वय ३२, रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस हवालदाराने फिर्याद दिली आहे. २५ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील अंमलदाराला आरोपी कांबळे याने फोन केला. आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून निरीक्षक पाटील बोलत असल्याची बतावणी केली. पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक त्याने मागितले. त्यानुसार, त्याला मोबाईलवर माहिती पाठवली. त्यानंतर आरोपी कांबळे याने या यादीतील कर्मचाऱ्यांना फोन सुरू केले. फिर्यादी महिला हवालदाराला फोन करून १५ हजारांची मागणी केली. त्यानंतर महिलेने वरिष्ठांच्या सांगण्यानुसार पडताळणीसाठी पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी कांबळे हा कोल्हापुरातील असल्याची माहिती मिळाली.

About The Author